नवी दिल्ली : कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह्य ट्रान्सपोर्ट उपलब्ध करण्यासाठी आता उबरने पुढाकार घेतला आहे. नॅशनल हेल्थ सर्विस प्रोवायडरने उबरसोबत करार केल्याचं सांगितलं आहे. या करारांतर्गत उबर सुरुवातीच्या टप्यात दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ, प्रयागराज आणि पाटना येथील डॉक्टरांसाठी 150 गाड्यांची फ्री सर्विस उपलब्ध करून देणार आहे.
सर्व वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करण्याच येणाऱ्या उबरच्या गाड्यांमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना उपलब्ध असणार आहेत. जसं की, ड्रायव्हर आणि प्रवाशी यांच्यामध्ये प्लास्टिकचं एक प्रोटेक्टिव बॅरियर असणार आहे. तसेच प्रत्येक प्रवाशी उतरल्यानंतर म्हणजेच, प्रत्येक राइडनंतर कारला डिसइन्फेक्ट करण्यात येणार आहे. याबाबत उबर इंडिया आणि दक्षिण आशियाई प्रेसिडंच प्रदीप परमेश्वरनने सांगितलं आहे की, 'उबरला या करारावर गर्व आहे. यासाठी आम्ही प्रत्येक ड्रायव्हरला ट्रेनिंग दिली आहे. तसेच त्यांना सॅनिटायझर आणि मास्क सारख्या आवश्यक गोष्टी पुरवण्यात आल्या आहेत. दरम्यान, एनएचए ही एक सरकारी एजन्सी असून आयुष्मान भारत योजनेसाठी काम करत आहे.