मार्केटयार्ड उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुभांगाच्या पार्श्वभूमीवर पुणे बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील फळबाजार, तरकारी, फूलबाजार, कांदाबटाटा विभाग आणि गूळ-भुसार विभाग येत्या बुधवारपासून (दि. २५) मंगळवारपर्यंत (दि. ३१) बंद ठेवण्याचा निर्णय आडते आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पुणेकरांना फळे, भाजीपाला मिळणार नसल्याची चिन्हे आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याच्या पाश्वभूमीवर माटयाडं आडते असोसिएशन, कामगार युनियनने मागील तीन दिवस स्वयंस्फूर्तीने मार्केट बंद ठेवले होते. आज बाजारातील व्यवहार सुरू झालेमंगळवारीही (दि. २४) मार्केटयार्ड सुरू राहणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरादारी म्हणून आडते आणि कामगार संघटनांनी २५ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. तर, यापूर्वीच फूलबाजार ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे आडत्यांनी कळविले आहे. गूळ-भुसार विभागही आजपासून बंद फळे, तरकारी, कांदा-बटाटा विभागांनंतर आता गूळ, भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत्यामुळे मंगळवारपासून (दि. २४) पुढील आदेश येईपर्यंत गूळ, भुसार विभाग बंद राहणार असल्याचे दी पूना मर्चेट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. यामुळे नागरिकांना जवळच्या किराणा दुकानातूनच धान्य आणि किराणा खरेदी करावे लागणार आहे.