कोरोना जागृतीसाठी गाण्याची निर्मिती
'हात धुवा, स्वच्छ ठेवा, नाक तोंड झाकून ठेवा, कोरोनाला पळवून लावा', 'रस्त्यावर धुंकू नका, इथंतिथं बागडू नका, सरकारचं जरा ऐका' अशा प्रकारच्या सूचना गाण्याच्या माध्यमातून करीत संगीतकार आणि गायक हर्षित अभिराज यांनी कोरोनाविषयक जनजागृती करीत या लठ्यामध्ये आपला वेगळ्याप्रकारे सहभाग नोंदविला आहे. ____ महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. एकमेकांशी संपर्क टाळणे हाच यावरील उपाय आहे; परंतु यासंदर्भात यावरील उपाय आहे; परंतु यासंदर्भात आजही लोकांमध्ये योग्य जनजागृती झाली नसल्याची चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. या जनजागृतीसाठी हर्षित अभिराज आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. हर्षित अभिराज आणि उदय गाडगीळ यांनी गायन केले असून, संगीत दिग्दर्शन हर्षित अभिराज यांनी केले आहे. वैभव शहा यांनी संगीत संयोजन केले असून, मुकुंद फडकुले यांच्या एल्कॉम स्टुडिओ येथे गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. विक्रम आंबिके यांनी तयार केलेल्या गाण्याच्या व्हिडीओला सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. _यासंदर्भात हर्षित अभिराज म्हणालेकोरोनाविषयक जनजागृती आणि लोकांना कमीत कमी प्रादुर्भाव व्हावा यासाठी सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. परंतु, जोपर्यंत त्यामध्ये जनतेचा सक्रिय सहभाग राहणार नाही, तोपर्यंत हा लढा यशस्वी होणार नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून यामध्ये आपण काय करू शकतो याचा विचार केला पाहिजेगाण्याच्या माध्यमातून यासंदर्भात प्रचार आणि प्रसार करावा असा विचार केला. यामध्ये नागरिकांनी स्वच्छता पाळण्यासाठी काय करावेलक्षणे काय आहेत, कोरोनासंदर्भात याचा समावेश करण्यात आला आहेशब्द अतिशय सोपे असल्यामुळे सर्वसामान्यांनाही लवकर लक्षात शकतील.