प्रादुर्भाव रोखण्यासाठी काल पंतप्रधानांच्या आवाहनानुसार नागरिकांनी घरीच बसणे पसंत केले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे चोरट्यांना एकही घर बंद सापडले नसल्यामुळे चोरीचा डाव साधता आला नाही. काल पुण्यात एकाही गंभीर गुन्ह्याची नोंद झाली नाही. मागील कित्येक वर्षात पुण्यामध्ये दिवसभरात चोरी झाली नसल्याचे घडले नव्हते. मात्र, जनता कपामळे चोरट्यांना संधी मिळाली नाही. कोरोनामुळे घरफोडीमारामारी, लुटमारीचे प्रकार बंद झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांनीही कोरोनाचा धसका घेतल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या महामारीपासून वाचण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार नागरिकांनी जनता कयूं पाळला. नागरिक घरात आणि पोलीस रस्त्यावर असल्यामुळे चोरट्यांना कोठेही डाव साधता आला नाही. पीएमपीएल बस, रेल्वे, एसटी बंद असल्यामुळे प्रवासादरम्यान नागरिकांच्या ऐवजावर डल्ला मारण्याची संधी चोरट्यांना मिळाली नाहीकोरोनामुळे बहुतांश खासगी आणि शासकीय कार्यालयास सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते ओस पडले आहेत. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे नागरिक घरीच असल्यामुळे चोरट्यांचे मनसुबे यशस्वी होत नाही. शहरात ३० पोलीस ठाण्यांसह १०३ पोलीस चौक्या असून, दिवसाला साधारण २५ ३० गुन्हे दाखल होतातमात्र, कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आल्यानंतर शहरातील गुन्ह्यांमध्ये घट आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यात दररोज होताना दिसत आहे. १५ मार्च रोजी शहरात स्वरूपाचे साधारण २१ गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर १६ मार्चला २० गुन्हे दाखल झाले. त्यानंतर दिवस गुन्हे दाखल होण्याचा आकडा २० ते २१ होता. त्यानंतर २० मार्चला १८ गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर २१ मार्चला फक्त ११ गुन्हे दाखल होते. त्यामध्ये वाहनचोरीचे तीन गुन्हे नोंदविण्यात आले होते.
कोरोना ठरला चोरावर मोर