कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील शाळा, महाविद्यालयांसह इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजारातील मास्कच्या विक्रीची संख्या घटली आहे. एकंदरीत मार्केटचे भाव सध्या स्थिर असून, सॅनिटायझरला विक्री तेजीत सुरूच असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ___ कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. हिंदुस्थानातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातदेखील कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण दररोज नव्याने आढळून येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिक मास्क आणि सॅनिटायटारच्या खरेटीसाठी मेडिकल दकानांमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणावर तटवडा निर्माण झाला होता. त्यादरम्यान अनेकांनी या वस्तूंचा काळाबाजार केला असल्याचेही प्रशासनाच्या कारवाईवरून समजून आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील शाळा, महाविद्यालयांसह इतर अनेक गोष्टी प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर अनेकांनी शहर सोडून आपापल्या गावी जाणे पसंत केले. परिणामी शहरातील लोकसंख्यादेखील झपाट्याने कमी होताना दिसली. सध्या शहरातील अनेक प्रमुख व इतर रस्ते रिकामे झालेले दिसत आहेत. याचा परिणाम मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीवर झाला असून, विक्रीतदेखील घट झाली आहे. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी मास्कचा तुटवडा जाणवत आहेतर ताप आणि डोकेदुखीवेळी वापर केल्या जाणाऱ्या पॅरासीटामॉलसोबत अनेक जेनेरिक औषधांच्या किमतीत वाढ झाली असल्याचे देखील विक्रेत्यांनी सांगितले.
मास्कची मागणी घटली; सॅनिटायझरची विक्री तेजीत