मुंबई (प्रतिनिधी) : हिंदवीस्वराज्यासाठी लाविली प्राणाची बाजी मानाचा मुजरा त्यांसीतेनरवीर तानाजी- सूर्याजी ! असे सार्थ वर्णन इतिहासाच्या पानापानात ज्याचे अजरामर झाले आहे असा शिवकाळीन महापराक्रमी योद्धा सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे ! हे शब्द उच्चारताच प्रत्येक मराठी माणसाचीछाती अभिमानाने रुंदावते. कारण तान्हाजी म्हणजे शौर्य, धैर्य, त्याग आणि स्वामी निष्ठेसाठी आत्म सर्पणहेच मराठी माणसाला माहित आहे.. 'राष्ट्र कार्यासाठी लढून मरावं, आणि मरून जगावं कसे' याची हजारो उदाहरणे महाराष्ट्रात शिव काळापासून आजपर्यंत घडत आली आहेतपुरंदरच्या तहानंतर कोंढाणा किल्ल्यावर तान्हाजी-सूर्याजी या दोन बंधूंचा महापराक्रम घडला नसता तर आज महाराष्ट्राचा भौगोलिक इतिहास काय दिसला असता हे चित्र नजरे समोर येते. दिल्लीच्या तख्तावर बसण्यापासून ते अटक पर्यंत भगवा फडकवण्याचा पुढे जो तेजस्वी इतिहास मराठी फौजेने घडवलात्याची मुहूर्तमेढ या घनघोर लढाईत रोवली गेली. सिंहगडा वरील या देदीप्यमान रणसंग्रामाला यंदा माघवद्य नवमी ला ३५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील मालुसरेंची संघटना असलेल्या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे संस्था, (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने 'पराक्रमाची विजय गाथा' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. मुख्य संपाद करवींद्र मालुसरे (अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ) असून त्यांच्या सोबत महेश दादा मालुसरे (जामगाव-मुळशी), बाळासाहेब मालुसरे जामगाव-मुळशी), बाळासाहेब मालुसरे निगडे-पुणे), प्रसाद मालुसरे (लव्हेरीभोर), प्रदीप मालुसरे (कासुर्डी-भोर) हे आहेत. नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे यांचे स्थल दर्शन, इतिहासातील नोंदीत्यांचा पराक्रम, आख्यायिकाया विषयांचा अंतर्भाव असलेली (१) महापराक्रमी योद्धा नरवीर तानाजी (२) नरवीर तानाजीच्या पराक्रमाचा ऐत्याहासिक शोध आणि बोधया विषयावर राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली असून १५०० शब्द मर्यादा असलेले वैविध्य पूर्ण लेख महाराष्ट्रातील अभ्यासकांनी .१ मार्च २०२० पर्यंत पाठवावेत असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष आबा मालुसरे (गोडोली) आणि प्रमुख कार्यवाह रवींद्रमालुसरे (पुणे) यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिके -सन्मान चिन्ह आणि सर्वाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. लेखपाठविण्याचापत्ता - रवींद्र मालुसरे (मुख्य संपादक) ६१२, घरकुल को-ऑप सहकारी सोसायटी, इमारत क्र.१०, सेंचुरी बाजार लेन, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. (संपर्क-९३२३११७७०४) tanajivijaygatha@gmail.com.
नरवीर तानाजी 'पराक्रमाची विजय गाथा' ग्रंथासाठी लेख स्पर्धा